कृषि उत्पन्न बाजार समिती, मंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे.
ओळख
नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती मंचर ची स्थापना २९ ऑगस्ट १९५० रोज़ी झाली व १ ऑक्टोबर १९७१ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली. मंचर मुख्य बाजार ३.०८ हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे. लोणी उपबाजाराची स्थापना दि.२५ ऑगस्ट १९७७ रोजी झाली व दि.२५ मार्च २०२० रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली.लोणी उपबाजार 3 हेक्टर मध्ये विस्तारलेले आहे. तसेच घोडेगाव, चांडोली खुर्द व तळेघर याठिकाणी बाजार समितीचे उपबाजार आहेत परंतु त्याठिकाणी अद्याप कामकाज सुरू झालेले नाही. घोडेगाव येथे ३.६४ हेक्टर, चांडोली खुर्द येथे ६ हेक्टर व तळेघर येथे ३.०५ हेक्टर जमीन आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती मंचरची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतूदी नुसार झालेली आहे. बाजार समितीचा मूळ उद्देश् शेतकर्यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकर्यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे हा आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती मंचर ही राज्यातील पहिली डिजीटल बाजार समिती आहे येथे शेतमालाचे पहिले वजन होते ते बाजार समितीने विकसीत केलेले अॅप वर घेतले जाते त्याचवेळी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर घेतला जातो व त्यानंतर लिलाव झाल्यानंतर अॅपमध्ये बाजार भाव भरल्यानंतर बाजार भावाचे मेसेज संबंधीत शेतकऱ्यांना जातात त्यामुळे लिलावाच्या वेळी शेतकरी हजर नसले तरी त्यांना बाजार भाव घर बसल्या कळतात तसेच बाजार समितीस सर्व माहिती एका क्लिकवर मिळते.