new-img

बंतोष च्या साथीने पारनेर आता हायटेक

अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच बंतोष प्रणालीचा वापर केला जाणार आहे. आमदार निलेश लंके, माजी विधानसभा अध्यक्ष विजयराव औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे, उपसभापती भाऊसाहेब शिर्के, सर्व संचालक मंडळ आणि सचिव सुरेश आढाव ह्यांच्या पुढाकाराने पारनेर बाजार समिती लवकरच हायटेक अर्थात डिजिटल होणार आहे.

पारनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाने बंतोष प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील अन्य बाजार समितीत सुरु असलेले कामकाज पाहिले. त्यानंतर आपल्याही बाजार समितीमध्येही अर्थात पारनेर बाजार समितीचे व्यवहार देखील बंतोष प्रणालीच्या सहाय्याने डिजिटल व्हावे ह्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे आता लवकरच पारनेर बाजार समितीमध्येही बंतोष प्रणालीचा वापर सुरु होणार आहे. त्यामुळे राज्यातील मंचर, जुन्नर, शिरुर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणेच पारनेर बाजार समिती देखील लवकरच हायटेक होणार आहे.

बंतोष प्रणाली ही एक रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाला मिळालेला भाव समजतो. तर दुसरीकडे शेतकरी, मापाडी, खरेदीदार, आडतदार ह्यांना बंतोष प्रणालीच्या माध्यमातून पावत्या बनवणे आणि त्यांचे रेकॉर्ड ऑनलाईन ठेवणे सोपे जाते. तसेच, वेळ, पैसा, मनुष्यबळ आदींची बचत होत असल्याने बाजार समित्यांकरिता बंतोष प्रणाली फायदेशीर आहे. बंतोषच्या मोबाईल ॲपमधून बाजार समितीचे व्यवहार डिजिटल होत असल्याने बाजार समित्यांकडून ह्या प्रणालीचा स्विकार होत आहे. मोबाईल ॲपद्वारे होणाऱ्या पावत्या, थर्मल प्रिंटरद्वारे हातोहात मिळणारी पावती, तसेच घरबसल्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअप आणि मेसेजवर मिळणारे अपडेट्स ह्यामुळे बंतोष ॲप अत्यंत प्रभावी ठरत आहे.