new-img

टोमॅटो चे दर एकाच महिन्यात २०० वरून २ रुपये किलो

महिनाभरापूर्वी 200 रुपये किलोने विकला जाणारा टाेमॅटाे आज फक्त 2 ते 5 रुपये किलो या मातीमोल भावात विकला जाताेय. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. बाजार समितीत टोमॅटोला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतमाल शेतातून मार्केटमध्ये पोहोचवण्याचा खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी टाेमॅटाे जनावरांना खाण्यास देत आहेत. शेतमालाचे भाव वाढले की संपूर्ण सरकारी यंत्रणा ग्राहकांच्या पाठीशी उभी राहते. मग शेतीमालाचे भाव कमी झाल्यावर हीच यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी का उभी राहत नाही? असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

टोमॅटोच्या ह्या परिस्थितीवरील सखोल माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - https://youtu.be/84U3m4j-xu8