new-img

बंतोष ॲप शेतकरी आणि तंत्रज्ञान यांच्या साठी दुआ

बाजार समितीत शेतकरी, वाहतूकदार, आडतदार, मापाडी, व्यापारी हे सर्व घटक आजही पारंपारिक पद्धतीने काम करताना दिसतात. त्यामुळेच ह्यातील प्रत्येक घटकाला अपेक्षित विकास साधता आली नाहीये. परंतू आता ही परिस्थिती बदलू शकते. याचे कारण प्रक्रिया आणि व्यवहार यांत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल घडवणारे बंतोष ॲप सर्वांसाठी उपलब्ध आहे. बंतोष ॲप हे शेतकरी आणि तंत्रज्ञान ह्यांच्यातील दरी कमी करण्यासाठी असून कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार ह्यामुळे ऑनलाईन करणे शक्य आहे.