new-img

ज्वारीच्या किरळामुळे जनावरांना होणार विषबाधा

ज्वारीच्या किरळामुळे जनावरांना होणार विषबाधा

https://youtube.com/shorts/KOnLKmdgbAk

तुम्ही पशुपालक शेतकरी आहात का? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ज्वारीपासून कडब्याच्या स्वरूपात जनावरांना चारा मिळतो. पण ज्वारीच्या किरळामुळे जनावरांना विषबाधा होऊ शकते. काय आहेत कारणे आणि उपाय ते मात्र या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत. ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ऍसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक अॅसिड जनावरांमध्ये विषबाधा करते. जनावरांनी पोंगे कमी प्रमाणात खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होऊन श्वासोश्वास व हृदयाचे ठोके वाढतात. जनावरांनी ज्वारीचे कोवळी पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो. जनावरे थरथर कापते व बेशुद्ध पडते, हृदय बंद पडल्याने शेवटी जनावर दगावते. यामुळे पशुपालकांनी वेळीच काळजी घ्यावी. ज्वारीची कोवळे पोंगे जनावरे खाणार नाहीत याची पशुपालकांनी काळजी घ्यावी.