new-img

जिवाणू खते का वापरावीत?

जिवाणू खते का वापरावीत?

https://youtube.com/shorts/7SwKah0W8bs

जिवाणू खते शेतीत वापरण्याचा विचार करताय का तर हा कामाचा व्हिडीओ आता सेव् करून ठेवा. जैविक खतामुळे जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारतो, जमीन जैविक क्रियाशील बनते व उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते. आर्थिक आणि पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होते. शेंगवर्गीय पिकामध्ये जिवाणू खताचा वापर केल्यास नत्रयुक्त गाठींचे प्रमाण मुळावर वाढते. हे जिवाणू हवा व जमिनीतील नत्र झाडाला उपलब्ध करतात. जिवाणूमुळे जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विविध रूपातून मुक्त करून मुलांना उपलब्ध केले जातात.जिवाणू मातीतील सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात कुजवतात या प्रक्रियेत विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात, त्यामुळे विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात उपयुक्त बदल होतात. पिकासाठी वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. शेतातील मातीची सुपीकता टिकण्यास मदत होते.