new-img

PM Kisan योजनेचा निधी वाढणार? १२ ऐवजी १५ हजार मिळणार,

PM Kisan योजनेचा निधी वाढणार? १२ ऐवजी १५ हजार मिळणार,

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात वक्तव्य केलंय. या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रूपयांचा निधी देत असते. आता हा निधी १५ हजार रूपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते  पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते बोलतांना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आहेत. शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेतंर्गत सरकारकडून वर्षाला सहा हजार रूपयांचा निधी दिला जातो. तर राज्य सरकार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रूपये देते. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारा हजार रूपये मिळतात, तर हीच मदत पंधरा हजार रूपये करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.