new-img

तुषार संच बसविल्यानंतर अशी काळजी घ्या

तुषार संच बसविल्यानंतर अशी काळजी घ्या

https://youtube.com/shorts/tGFIdk6DgiI

पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुम्ही शेतात तुषार संच बसला असेल तर हा व्हिडीओ पुर्ण पहा. तुषार सिंचन पद्धतीत पाणी फवारून दिले जात असल्यामुळे हवेत बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तुषार पद्धत शक्यतो दुपारी चालवू नये. सकाळी किंवा सायंकाळी वारा मंद असताना तुषार संच चालवावा. यासाठी लॅटरल पाईपलाईन मधील व तुषार तोट्यातील अंतरात बदल करून देखील चालवणे शक्य आहे. हंगामाच्या सुरुवातीला किंवा नेहमीच तुषार संच चालू करताना, लॅटरल पार्डपचे बुच काढून ठेवावे व त्यातून काही वेळेसाठी पाणी बाहेर पडू द्या. म्हणजे पाईपमधील कचरा किंवा इतर अडथळे निघून जातील आणि नंतर लॅटरल बंद करा. पंपाचा दाब जेवढ्या तोट्यांना पुरतो त्या पाण्याचा फवारा व्यवस्थित फेकला जाते तो पाहा.