new-img

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदा करणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये केली. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं. 
कृषी खातं संवेदनशील असून मी त्याच्या दुप्पट संवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे फोन उचलले जातील, कारवाई केले जातील, न्याय दिला जाईल. वेळ पडल्यास गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. याशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर कायदा केला जाईल, मंत्रिमंडळात विषय मांडला जाईल, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.