new-img

१५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा.

१५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा.

https://youtube.com/shorts/gfSVLsbC2Fc

शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात देखील वर्षाला १२ हजार रुपये जमा होतात का? कारण तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, आता १२ ऐवजी तुमच्या खात्यात जमा होणार १५ हजार रुपये. कारण पीएम किसान योजनेचा निधी वाढणार, आता हे आम्ही नाही म्हणत, स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात वक्तव्य केलंय. या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रुपयांचा निधी देत असते. आता हा निधी १५ हजार रुपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. बाकी तुम्ही या योजनेचा लाभ घेता का, कमेंट करून नक्की कळवा.