new-img

द्राक्ष बागेतील पिंक बेरी समस्येवर उपाय

द्राक्ष बागेतील पिंक बेरी समस्येवर उपाय

https://youtube.com/shorts/4B4mP1mU0oc

तुम्ही तुमच्या शेतात द्राक्ष बाग लावली आहे का? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. जर तुमच्या बागेतील तापमान १० अंश सेल्सियस पेक्षा कमी असल्यास मण्यातील हिरवे रंग गुलाबी रंगात बदलू शकते. याला पिंक बेरी असं म्हणतात. त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. पिंक बेरी टाळण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो जसे, की द्राक्षाचे घड पेपरने झाकावे. द्राक्ष घडावर जैविक किड नियंत्रकाची फवारणी करून घड झाकावे. बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. बागेत आच्छादन करावे. बागेभोवती पडदे लावावेत. बागेत ठिकठिकाणी शेकोटी पेटवून धूर करावा आणि हा कामाचा व्हिडीओ आताच सेव्ह करावा. आणि इतरांना देखील नक्की शेअर करावा.