new-img

या जातीची शेळी पाळा, पैसाच पैसा कमवा.

या जातीची शेळी पाळा, पैसाच पैसा कमवा.  

https://youtube.com/shorts/XLrc9l2u4Og

शेळी पालन करण्याचा विचार असेल तर तुम्ही नायजेरियन डॉर्फ या जातीचा विचार करायलाच हवा. नायजेरियन डॉर्फ अगदी कमीत कमी चाऱ्यामध्ये जास्त नफा देण्याची क्षमता या प्रजातीत आहे. या जातीच्या शेळ्या आकाराने अगदी लहान असतात. जर आपण या प्रजातीच्या शेळ्यांचा प्रजनन दर पाहिला तर तो इतर प्रजातीपेक्षा जास्त आहे. या शेळ्या सरासरी दोन ते चार पिल्लांना जन्म देतात व सहा ते सात महिन्यांमध्ये परिपक्व होऊन दूध द्यायला लागतात. या जातीच्या शेळ्या खूप मजबूत आणि कणखर असतात. त्यामुळे जास्तीची काळजी घेण्याची गरज नसते. दूध आणि मांस उत्पादनासाठी नायजेरियन डॉर्फ हे शेळी खूप उत्तम मानली जाते. दिवसभरात इतर प्रजातीच्या शेळ्यांना जितका चारा लागतो त्यापेक्षा खूप कमी चारा या शेळ्यांना लागतो. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर कमी खर्च, कमी कष्ट आणि कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही चांगला नफा या शेळ्यांच्या पालनातून मिळवू शकता.