द्राक्ष घडांना पेपर लावण्याचे फायदे
- By - Team Agricola
- Dec 28,2024
द्राक्ष घडांना पेपर लावण्याचे फायदे
https://youtube.com/shorts/Id_SnW-94W4
तुम्ही शेतात द्राक्ष बाग लावली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. द्राक्ष घडांना पेपर लावण्याचे अनेक फायदे आहेत जसे की द्राक्ष घडांचे ऊन व त्यामुळे होणाऱ्या सनबर्निंग सारख्या समस्यांपासून संरक्षण होते. घडांचे थंडीपासून संरक्षण होऊन मण्यांचा योग्य आकार मिळण्यास मदत होते. पिंक बेरी या समस्येपासून मुक्तता मिळते, किंबहुना ही समस्या टाळण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. घडांचे पक्षी, प्राणी इ. यांपासून होणारे नुकसान टाळता येते. द्राक्ष काढणीवेळी निर्यातीसाठी आवश्यक मण्यांचा आकार, आकर्षक एकसारखा रंग मिळून निर्यातक्षम मालाचे उत्पादन वाढून अधिक आर्थिक फायदा मिळतो.