new-img

कोंबडी खाद्याचा व्यवसाय करा आणि मिळवा दुप्पट नफा

कोंबडी खाद्याचा व्यवसाय करा आणि मिळवा दुप्पट नफा

https://youtube.com/shorts/JMda_z9QHbM

तुम्हाला जर कोंबडी खाद्य बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अगोदर कुठल्या प्रकारचे खाद्य तयार करायचे आहे हे ठरवावे लागेल. कारण कोंबडी खाद्यामध्ये चिक, बॉयलर आणि लेयर अशा तीन प्रकारच्या कोंबड्यांचा समावेश होतो. यासाठी कच्चामाल म्हणून तांदूळ, मका, सोयाबीन, गहू, मीठ, फिश मील इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. यामध्ये अनेक पद्धती आहेत परंतु हिट अँड ट्रायल खाद्य पद्धती खूप सोपी आहे. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जे काही खाद्य तयार करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला कोणते धान्य वापरून ते तयार करायचे आहे हे निश्चित करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते ग्राइंडरमध्ये दळावे लागते व त्यानंतर आपल्या गरजेनुसार ते जाड किंवा बारीक ठरवावे लागते. व त्यानंतर खाद्यामध्ये आवश्यक असणारे, तुम्ही निश्चित केलेल्या खाद्य सूत्रानुसार वजन केलेले सर्व साहित्य सुमारे सहा ते दहा मिनिटे मिक्सरद्वारे मिक्स करून घ्यावे. त्यानंतर तुम्हामच्या खाद्याची कॅटेगरी कोणती आहे त्यानुसारच बॅग पॅक कराव्या लागतात.