new-img

फळबागेसाठी जमिनीची निवड कशी असावी?

फळबागेसाठी जमिनीची निवड कशी असावी?
फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. 
फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. 
भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत,मध्यम पोताची जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.
मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी असावे. 
जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यापेक्षा जास्त नसावा
ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे,त्या ठिकाणच्या मातीचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे.