गाई-म्हशींचा फऱ्या आजार टाळण्यासाठी उपाय
- By - Team Agricola
- Dec 30,2024
गाई-म्हशींचा फऱ्या आजार टाळण्यासाठी उपाय
https://youtube.com/shorts/sbjoOMHsEp8
जनावरांमध्ये फऱ्या आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. पण तो टाळण्यासाठी काय उपाय करावा तेही सांगते. तलाव किंवा नदीचे पाणी जनावरांना जास्त करून प्यायला देऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारी जनावर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. गोठ्यामध्ये वेगळा कप्पा करावा. जनावरांना चारा देताना अगोदर निरोगी जनावरांना चारा किंवा पाणी द्यावे. या आजाराने प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही वस्तू स्वच्छ करून धुवाव्यात. जनावरांना आलेली सूज हायड्रोजन पेरॉक्साइड वापरून स्वच्छ करावी आणि पोटॅशियम परमॅग्नेटने भरून घ्यावी. जनावरांना लसीकरण केले नसेल तर त्यासाठी ट्रायओव्हॅकची लस द्यावी. तसेच पेनिसिलीन, टेट्रासायक्लीनची इंजेक्शन घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पशु वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधून सगळे उपचार करावेत.