दुधातील फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना
- By - Team Agricola
- Dec 31,2024
दुधातील फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना
https://youtube.com/shorts/jXj0J2nSHY4
तुम्ही दुध उत्पादक शेतकरी असाल तर दुधातील फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात. नं १ जनावरांच्या आहारात हिरव्या चाराबरोबर वैरणीचा समावेश करावा. नं २ ऊसाच्या वाढ्यांचा वापर टाळावा. नं ३ गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मका, भरडा, तूर, हऱभऱा, भात, गव्हाचा कोंडा, योग्य प्रमाणात द्यावा. नं ४ दुध काढण्यातील अंतर समान असावे. नं ५ दुध काढतांना जनावराची कास स्वच्छ धुवावी, म्हणजे रक्तभिसरण वाढेल. नं ६ दुध काढतांना पुरेशी स्वच्छता बाळगावी, म्हणजे कासदाहसारखे आजार जनावरांना होणार नाहीत. नं ७ दुधाळ जनावरांना शक्य असल्यास मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. व्यायाम झाल्यामुळे गाईच्या दुध उत्पादनात आणि फॅटच्या प्रमाणात वाढ होईल.