new-img

गोंदिया बाजार समितीत शेतकऱ्याला चांदीचा शिक्का भेट

गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समिती इथे नवीन धानाची आवक सुरू झाली. मंगळवार (दि 26 सप्टेंबर) कामठा आणि सेंद्रीटोला/ पिंडकेपार येथील शेतकर्‍यांनी धानविक्री केली. तेव्हा धानाला 2001 रूपये भाव मिळाला. त्याबद्दल कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकर्‍यांचा शाल, श्रीफळ आणि चांदीचा शिक्का भेट देवून सत्कार करण्यात आला. हंगामात प्रथमच सेंद्रीटोला/पिंडकेपार आणि कामठा येथील शेतकर्‍यांने धानविक्री आणले होते. तेव्हा दोन्ही शेतकर्‍यांच्या धानाला 2001 रूपये भाव मिळाला, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.