new-img

राहता बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी 800 रुपये प्रति किलो दर

अहमदनगरमधील राहाता बाजार समितीत पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील युवा शेतकरी रमेश गाडेकर यांच्या डाळिंबाला उच्चांकी 800 रुपये प्रति किलो दर मिळाला. डाळिंबाला 800 रुपये प्रति किलो हा आतापर्यंत मिळालेला उच्चांकी दर असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.

डाळिंबाची ताड करत गाडेकर यांनी आपली डाळिंब राहाता बाजार समितीत आणली. त्यांच्या इतर डाळिंबाला सरासरी तर भगवा व्हरायटीला हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा करता प्रतिकिलो 800 रुपयांचा दर मिळाला. ह्या व्हरायटीच्या 26 किलो डाळिंबाला 16 हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला.