new-img

सोयाबीन खरेदी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन खरेदी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत वाढली आहे. ६ जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ही मुदत होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांच्यामार्फत १२ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.