गांडूळखत तयार करण्यासाठी लक्षात ठेवा.
- By - Team Agricola
- Jan 01,2025
गांडूळखत तयार करण्यासाठी लक्षात ठेवा.
https://youtube.com/shorts/57Qm8fuicr8
शेतकऱ्यांनो, शेतात गांडूळ खत तयार करायचे असेल तर हा कामाचा व्हिडीओ न चुकता आताच सेव्ह करा. नं १: गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा. नं २: शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे. नं ३: गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व २० दिवस कुजवावे. नं ४: खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: १५ ते २० सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा. नं ५: गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याआधी १ दिवस पाणी मारावे. नं ६: गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे. नं ७: व्हर्मीवाॅश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाॅश जमा करण्याचे नियोजन करावे.