new-img

गांडूळखत तयार करण्यासाठी या महत्वाच्या टिप्स

गांडूळखत तयार करण्यासाठी या महत्वाच्या टिप्स

गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा. 
शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे. 
गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व २० दिवस कुजवावे. 
खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: १५ ते २० सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा. 
गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याआधी १ दिवस पाणी मारावे. 
गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे. 
व्हर्मीवाॅश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाॅश जमा करण्याचे नियोजन करावे.