new-img

गांडूळ खताचे १० फायदे

गांडूळ खताचे १० फायदे

https://youtube.com/shorts/XDu9Aif-Uxg

सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतकरी शेतीत करतात. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. जमिनीचा सामू (पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरमसाठ वाढ होते. मातीचा कस टिकून राहतो. खतामुळे जमिन सुपीक राहते.