केंद्र सरकारचा नववर्षाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
- By - Team Agricola
- Jan 02,2025
केंद्र सरकारचा नववर्षाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किंमतीत मिळणार..
शेतकऱ्यांना आता परवडणाऱ्या किमतीत डीएपी खतं उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएपी खतांसाठी ३ हजार ८५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना डीएपी खताची एक बॅग १३५० रुपयांना मिळणार आहे. डीअमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी खतांची किरकोळ किंमत प्रति ५० किलोसाठी १३५० रुपये कायम ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर नंतरही अतिरिक्त अनुदान सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हा निर्णय झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणखी एक निर्णयही आला असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विमा योजना अधिक आकर्षक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पीक विमा योजना सुलभ करण्यासाठी, त्याच्या नियम आणि नियमांमध्ये सुधारणा केली जाणार. यासह, पिकांचा विमा स्वस्त दरात आणि सुलभ नियमांनुसार मिळेल याची व्यवस्था केली जाणार आहे.