new-img

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार वांबोरी इथे बंतोष प्रणालीचे लोकार्पण

कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी (जि. अहमदनगर) उपबाजार आवार वांबोरी इथे सोमवारी (दिनांक 2 ऑक्टोबर) शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप साॅफ्टवेअर अर्थात 'बंतोष' प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून बंतोष प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण बाबुराव तनपुरे यांच्या शुभहस्ते बंतोष प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले, तर माजी सभापती अॅड भानुदास सावळेराम नवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी बाबासाहेब भिटे (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर) नितीन बाफना (माजी सरपंच ग्रामपंचायत वांबोरी) मच्छिंद्र सोनवणे (राहुरी तालुका अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस) एकनाथराव ढवळे (माजी सदस्य पंचायत समिती राहुरी) संदीप निकम (ग्रामपंचायत सदस्य कात्रड) बापूशेठ मुथा, अशोक साळुंखे, सुरेशलाल बाफना, मधुकर पवार, गोरक्षनाथ पवार (उपसभापती) बंतोष प्रणालीचे अधिकारी निलेश पाटील आणि बाळासाहेब खुळे, भाऊसाहेब खेवरे, रामदास बाचकर, सुभाष डुकरे, सचिव जरे साहेब यांसह शेतकरी, आडतदार, व्यापारी, खरेदीदार, व्यापारी, हमाल तोलणार, व्यापारी गाळा धारक आदीजण उपस्थित होते.

सभापती अरुण तनपुरे यांनी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या शेतमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप सॉफ्टवेअर बंतोष प्रणालीच्या कामकाजाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी वांबोरी उपबाजार आवार येथील व्यापारी असोशियन यांनी सभापती अरुण तनपुरे यांचा सत्कार केला. बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.