सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ पुरेशी आहे का?
- By - Team Agricola
- Jan 02,2025
सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ पुरेशी आहे का?
सोयाबीनचे भाव गेल्या दोन वर्षांपासून घसरले आहेत. सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी सोयाबीन विकण्याऐवजी घरात साठवून ठेवत आहे. सरकारने सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रूपये अनुदानाची मदत मागील २ महिन्यापूर्वी दिली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळावा यासाठी हमीभाव केंद्रही सुरू केले आहेत . त्याची मुदतही ३१ डिसेंबर अखेर संपली होती. पण शेतकऱ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सोयाबीन खरेदी नोंदणीत मुदत वाढ केली आहे. नेमकं का शेतकरी सोयाबीन विकत नाही? सध्या काय दर आहेत? खरेदी नोंदणीसाठी मुदत वाढ काय दिली? अशा तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषन आजच्या व्हिडीओत पाहूयात.