मल्चिंग पेपरचा वापर असा करा
- By - Team Agricola
- Jan 04,2025
मल्चिंग पेपरचा वापर असा करा
https://youtube.com/shorts/W8RP2WFffWY
मल्चिंग पेपर कसा वापरावा याची माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. नं १ ज्याठिकाणी किंवा ज्यापिकासाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे, त्यावेळी प्रथम संबंधित पिकासाठी लागणारे बेड व्यवस्थित तयार करावे. नं २ बेड तयार करताना माती, दगड, काडी, कचरा काढून स्वच्छ माती युक्त बेड तयार करावे. नं ३ बेड तयार केल्यानंतर संपूर्ण बेड व्यवस्थितपणे ओले करावे व चांगला वापसा आल्यानंतर पेपर बेडवर व्यवस्थितपणे अंथरावा, त्यामुळे हवा इत्यादी घटकांचा प्रभाव न होता बाष्पीभवन रोखले जाते. नं ४ विविध पिकांचे लागवड अंतर वेगवेगळे असते; त्या लागवड अंतरानुसारच पेपर अंतर ठरवले जाते. आपल्याला जेवढा पेपर आवश्यक आहे, तेवढा पेपर व्यवस्थित कापून घ्यावा.