new-img

मल्चिंग फिल्म अशी खरेदी करा

मल्चिंग फिल्म अशी खरेदी करा

https://youtube.com/shorts/gi0z1esUSPI

मल्चिंग फिल्म खरेदी करण्याचा विचार असेल तर या गोष्टीकडे लक्ष नक्की द्या, जसे बाजारामध्ये खूप कंपन्यांचे चांगले मल्चिंग पेपर मिळतात; पण फिल्म खरेदी करताना स्वस्तात फिल्म देणाऱ्या कंपन्यांना मुळीच बळी पडू नका. अपारदर्शक किंवा काळी फिल्म खरेदी करताना तिला सूर्यप्रकाशाच्या दिशेने धरावे; जर तिच्यातून सूर्यप्रकाश आरपार झाला, तर अशी फिल्म खरेदी करू नये. सध्या बाजारामध्ये लाल, निळ्या अशा विविधरंगी फिल्म मिळतात, पण या फिल्म खरेदी करण्याचा मोह टाळावा. शक्यतो याऐवजी काळी किंवा सिल्वर फिल्म खरेदी करावी. काळी प्लास्टिक फिल्म जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते, तसेच पिकांमध्ये तनवाढीला नियंत्रित करते. बागायती शेतांमध्ये या फिल्मचा वापर केला जातो. बाकी हा कामाचा व्हिडीओ इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा. त्यांनाही मल्चिंग खरेदी करताना उपयोगी पडेल.