new-img

मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे

मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे

https://youtube.com/shorts/TDgSiNNjU_A

शेतकऱ्यांनी कमी खर्चिक असलेल्या मल्चिंग पेपरचा वापर करून अधिक उत्पादन वाढवावे असं मी का म्हणते सांगते. कारण मल्चिंग पेपर वापरण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? खतांच्या एकूण मात्रेत बचत होते कारण मल्चिंग पेपरमुळे खत पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ थांबते. मल्चिंग पेपरमुळे तण वाढू शकत नाही. पावसाळ्यात पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबते. जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होते. मल्चिंग पेपर आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. मातीला व पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते. जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात, उगवण दोन-तीन दिवस लवकर होते. असे अनेक फायदे मल्चिंग पेपर वापरल्यामुळे शेतकऱ्यांना होते.