new-img

वांबोरी उपबाजार आवारात कांद्याला भाव

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात सोमवारी (दि. 9 ऑक्टोबर) गावराण कांदा 9 हजार 363 गोणींची आवक झाली होती. त्यापैकी 593 गोणी कांदा अडीच हजार ते 3 हजार 100 रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. मागील काही महिन्यात कांद्याच्या भावात सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढ झाली आहे.

सोमवारी दाखल झालेल्या कांद्यापैकी अपवादात्मक गोण्यांचे उच्च बाजारभाव व गोणी, यात 43 गोणी (3005 ते 3100) 45 गोणी (2905 ते 3000) 35 गोणी (2805 ते 2900) 61 गोणी (2705 ते 2800) असे भाव मिळाले. एक नंबर कांदा 2205 ते 2700, दोन नंबर कांदा 1705 ते 2200, तीन नंबर कांदा 200 ते 1700 तर गोल्टी कांदा 1700 ते 1000 दराने विकला गेला.

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. जानेवारी 2023 नंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण पहायला मिळाली होती. परंतू मागील 2 ते 3 महिन्यांपासून कांदा दरात किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत कांद्याचे भाव दोन ते अडीच हजारांवर आहेत.