new-img

खरीप कांद्याच्या क्षेत्रात 2 लाख हेक्टरने घट

देशात गेल्या वर्षी 3 लाख 76 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. यंदा हे क्षेत्र 3 लाख 43 हजार हेक्टरचे असून, गेल्या महिन्याअखेर 2 लाख 47 हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड झाली आहे. कांद्याच्या प्रमुख दहा उत्पादक राज्यांमध्ये लागवडीमधील घट उद्दिष्टाच्या तुलनेत 1 लाख 96 हजार हेक्टरची आहे.