new-img

मालेगाव बाजार समिती बनणार हायटेक

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच बंतोष प्रणालीचा वापर केला जाणार आहे. शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप साॅफ्टवेअर अर्थात 'बंतोष' प्रणालीचा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून स्विकार करण्यात आला असून फक्त मालेगाव मुख्य बाजार नाही तर बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या निमगाव, झोडगे आणि मुंगसे इथेही बंतोष प्रणालीचा वापर होणार आहे.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अद्वय(आबा) हिरे-पाटील , उपसभापती ॲड. विनोद चव्हाण, सर्व संचालक मंडळ आणि सचिव ह्यांच्या पुढाकाराने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हि आता डिजिटल अर्थात हायटेक होणार आहे.

मालेगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने बंतोष प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील अन्य बाजार समितीत सुरु असलेले कामकाज पाहिले. त्यानंतर आपल्याही बाजार समितीमध्येही बंतोष प्रणालीद्वारे व्यवहार सुरु व्हावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे आता लवकरच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार समितीचे अन्य तीन उपबाजार आवार इथे शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप साॅफ्टवेअर बंतोषचा वापर सुरु होणार आहे. त्यामुळे राज्यातील मंचर, जुन्नर, शिरुर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणेच मालेगाव बाजार समिती देखील डिजिटल होणार आहे.

बंतोष साॅफ्टवेअर -

बंतोष प्रणाली ही एक रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाला मिळालेला भाव समजतो. तसेच शेतकरी, मापाडी, खरेदीदार, व्यापारी आदींना बंतोष प्रणालीच्या माध्यमातून पावत्या बनवणे आणि त्यांचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवणे सोपे जाते. वेळ, पैसा, मनुष्यबळ आदींची बचत होत असल्याने बाजार समित्यांसाठी बंतोष प्रणाली फायदेशीर आहे. मोबाईल ॲपद्वारे होणाऱ्या पावत्या, थर्मल प्रिंटरद्वारे हातोहात मिळणारी पावती, तसेच घरबसल्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअप आणि मेसेजवर मिळणारे अपडेट्स ह्यामुळे बंतोष प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे.