new-img

सीसीआय कडून दिवाळी नंतर कापूस खरेदी

भारतीय कापूस महामंडळ ‘सीसीआय’ने दिवाळीनंतर कापूस खरेदी करण्याचा निर्णय केला आहे. 'सीसीआय' सहा केंद्रांवर खरेदी करणार आहे. ‘सीसीआय’चा ‘सब एजंट' म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करते. पणन महासंघाकडून राज्यात 50 केंद्रावर कापूस खरेदी होत असते. जळगाव, नागपूर, वणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, परभणी, नांदेड, परळी व छत्रपती संभाजीनगर या 11 झोनमध्ये 2 टप्प्यांत कापूस खरेदीची सुरुवात पणनकडून केली जाईल. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.