new-img

बंतोष च्या साथीने वैजापूर बाजार समिती बनणार डिजिटल

'बंतोष'च्या साथीने वैजापूर बाजार समिती बनणार डिजिटल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या शिऊर बाजार समितीत लवकरच शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप सॉफ्टवेअर अर्थात बंतोष प्रणालीचा वापर सुरु होणार आहे.

आमदार मा. श्री. रमेश बोरनारे आणि मा. डॉ. दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती मा. श्री. रामहरी (बापू) पा.जाधव, उपसभापती मा. सौ. शिवकन्या मधुकर पा.पवार, सर्व संचालक मंडळ आणि सचिव मा.श्री. प्रल्हाद मोटे यांच्या पुढाकाराने वैजापूर बाजार समिती आणि तिची उपबाजार आवार असलेली शिऊर बाजार समिती ही हायटेक होणार आहे.

वैजापूर बाजार समितीच्या पदाधिकारी, सर्व संचालक मंडळाने बंतोष प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील अन्य बाजार समितीत सुरु असलेले कामकाज पाहिले. त्यानंतर आपल्याही बाजार समितीमध्येही बंतोष प्रणालीद्वारे व्यवहार सुरु व्हावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

त्यामुळे आता लवकरच वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप साॅफ्टवेअर बंतोषचा वापर सुरु होणार आहे. त्यामुळे राज्यातील अन्य मंचर, जुन्नर, शिरुर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणेच वैजापूर बाजार समिती देखील डिजिटल होणार आहे.