new-img

लासलगाव बाजार समिती 12 दिवस बंद राहणार

लासलगाव बाजार समिती 12 दिवस बंद राहणार

कांद्याची पंढरी अशी ओळख असलेली नाशिकची लासलगाव बाजार समिती आता 12 दिवस बंद राहाणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत ही बाजारपेठ बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

दिपावली सणानिमित्त कांदा विभागातील व्यापारी वर्ग हे कांदा या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवार मंगळवारपासून अर्थात 7 नोंव्हेबर पासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला दिले. विभागातील व्यापारी वर्ग हे कांदा या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने तसेच शुक्रवारी ते शनिवारी नोव्हेंबरअखेर धान्य विभागातील व्यापारी वर्ग हे धान्य या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने बाजार समिती बंद राहणार आहे.