new-img

चिंतामणी बाजार समिती मूल्यांकनात राज्यात अव्वल

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (स्मार्ट) अंमलबजावणी पणन संचालनालयाकडून केली जात आहे. 2022-23 या वर्षात बाजार समित्यांमधील उपलब्ध सोयीसुविधा, मोजमाप पद्धती, शेतीमाल लिलावासाठी असलेले लिलाव शेड, गोदाम, शेतकऱ्यांच्या नोंदी आदी सुविधांची पाहणी राज्यभरातील खासगी बाजार समित्यांत करण्यात आली होती.

खासगी बाजार समितीच्या झालेल्या मूल्यांकनात बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समिती राज्यात अव्वल ठरली. यासोबतच शेलू बुद्रुक, वणी, दत्तरामपूर या बाजार समित्याही पहिल्या चारमध्ये आल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलेल्या सोयीसुविधा व इतर बाबींत चिंतामणी बाजार समिती सरस ठरली असून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.