new-img

ज्ञानात भर : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे या संस्थेत देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, टिशू कल्चर, बनाना प्लॅन व नर्सरी आदी प्रशिक्षण देण्यात येते. परिसराच्या जवळ वन्यजीवांचा वावर असून राष्ट्रीय पक्षी मोर, लांडोर, हरीण, भेकर, ससे इ. प्राणी इथे आढळतात.

कृषि पणन मंडळाच्या शेती विभाग, तळेगाव दाभाडे अंतर्गत 150 एकर जमीन क्षेत्र आहे. सदरचे क्षेत्र मुख्यफार्म आणि गिलबिल पट्टी असे दोन वेगवेगळया ठिकाणी असून मुख्यफार्म हे प्रक्षेत्र तळेगाव दाभाडे शहरास लागून आहे. तर, गिलबिल पट्टी हे प्रक्षेत्र मुंबई - पुणे महामार्गास लागून आहे.