new-img

सोलापूरमध्ये 4 दिवस कांदा लिलाव राहणार बंद! जाणून घ्या कारण

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव 4 दिवस बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली आहे. येत्या 11 जानेवारीला तसेच 13 ते 15 जानेवारीला बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीकडून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त तीन दिवस बाजार समितीतील कांदा बंद राहणार असल्याचे बाजार समितीने कळविले आहे. त्याचबरोबर वेळअमावस्या निमित्त 11 जानेवारीला देखील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. सुट्टीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपला कांदा आणू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.