new-img

तुरीला 9 हजारचा भाव, शेतकरी सुखावला, पाहा बाजार समितीनिहाय दर

राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात मागील आठवड्यात झालेली वाढ कायम असून, काही बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिर आहेत. तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने उसळी घेतल्याचे दिसत आहे. जालना येथील बाजार समितीत बुधवारी (दि. 17) तुरीला सर्वाधिक कमाल 9901 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. जालना बाजार समितीत पांढऱ्या तुरीची 2324 क्विंटल आवक झाली, तिथे कमाल 9901 ते किमान 7100 तर सरासरी 9400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

दुसरीकडे अमरावती बाजार समितीत लाल तुरीची 462 क्विंटल आवक झाली, तिथे कमाल 9494 ते किमान 8000 तर सरासरी 8747 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अक्कलकोट बाजार समितीत लाल तुरीची 600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9401 ते किमान 8800 तर सरासरी 9100 रुपये प्रति क्विंटल, अकोला जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीची 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9350 ते किमान 7595 तर सरासरी 8700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर राज्यातील करमाळा, गेवराई, चिखली, दर्यापूर, मुखेड, निलंगा, मेहकर, चांदूर बाजार, चोपडा, यवतमाळ, सोलापूर या बाजार समित्यांमध्येही बुधवारी तुरीला कमाल 9000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला.