new-img

नंदूरबार बाजार समितीत मिरच्यांची विक्रमी आवक!

देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरचीची बाजारपेठ अशी ओळख असणाऱ्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक होत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली असून पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केलाय. परंतू दुसरीकडे मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी विक्रीच्या व्यवहार बंद होता. मात्र, सोमवारपासून (दि. 15) पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. त्यामुळे मिरचीची आवक वाढली आहे. मिरची खरेदी पुन्हा सुरु झाली असली तरी जादा आवक झाल्याने मिरचीचे दर घसरलेत. सध्या मिरचीला 2 हजार रुपयांपासून ते 4 हजारपर्यंतचा भाव मिळतोय. ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.