new-img

कांदा बाजार अपडेट! सोलापूर बाजार समितीत 4 महिन्यांत 625 कोटींची खरेदी

महाराष्ट्रात नाशिकनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांद्याच्या खरेदी-विक्रीत मोठा नावलौकिक झाला आहे. मागील चार महिन्याच्या कालावधीत राज्यात सर्वात जास्त कांदा आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली. कांदा विक्रीतून बाजार समितीला सेस, बाजार फी व इतर घराच्या रूपाने कोट्यावधी रुपयांचा लाभ झाला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 4 महिन्यात 625 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा कांद्याची खरेदी झालीये. त्यातून बाजार समितीला जवळपास 6 कोटी 25 लाख रुपयांचा सेस तर अडत्यांना 37 कोटी रुपयांचा नफा झालाय. तर हमालांना 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले. शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र म्हणावा तेवढा नफा आलेला नाही. उलट घसरत्या दरामुळे निराशाच पदरी पडली आहे.