new-img

नाशिक बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद!

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी लावल्यानंतर सतत कांद्याच्या दरात घसरण सुरु आहे. कांद्याच्या दरात सतत घसरण होत असल्यामुळे नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. 29) कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला. सोमवारी लासलगावात कांद्याला सरासरी 1 हजार 67 रुपये भाव तर जास्तीत जास्त 1 हजार 140 रुपये प्रति क्विंटल एवढा कमी दर मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पडला. कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटवावी, कांद्याला हमीभाव द्यावा, अशा केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.