new-img

सिल्लोड-सोयगाव बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलची सत्ता

सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वातील जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनेलने भाजप पुरस्कृत श्री सिद्धेश्वर-मुर्डेश्वर शेतकरी परिवर्तन सहकार विकास पॅनलला व्हाइट वॉश देत सर्व अठरा जागांवर विजय मिळविला आहे.

रविवारी (दि. 28) झालेल्या मतदानाची टक्केवारी बघता निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीस शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात सुरूवात झाली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास चित्र स्पष्ट होऊन सत्तारांच्या नेतृत्वातील पॅनेलने जोरदार मुसंडी मारीत सर्वच्या सर्व अठरा जागांवर विजय संपादन केल्यामुळे बाजार समितीची एकहाती सत्ता पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार यांनी काबीज केली.