new-img

‘सीसीआय’मार्फत पाच कापूस खरेदी केंद्रे सुरू

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा अशा एकूण पाच ठिकाणीच कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून कापसाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.

कापूस पणन महासंघाच्या नांदेड विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजीकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या प्रभारी विभागीय व्यवस्थापकांनी केले आहे.