new-img

सोलापूर बाजार समितीत कांदा उत्पादकांचे चारशे कोटींचे नुकसान!

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल 410 कोटी 46 लाख 96 हजार बुडाले आहेत. डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर सरसकट बंदी घातली. केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा दराचा अक्षरशः कचरा झालाय.

डिसेंबर महिना -
एकूण आवक : 13 लाख 46 हजार 567 क्विंटल
मिळालेले दर : किमान 100 तर कमाल 5100 रुपये, प्रतिक्विंटल सरासरी 1600 रुपये
एकूण विक्री : 254 कोटी 50 लाख 71 हजार 900 रुपये

जानेवारी महिना -
एकूण आवक : 12 लाख 18 हजार 868
मिळालेले दर : किमान 100 तर कमाल 3500 रुपये, प्रतिक्विंटल सरासरी 1400 रुपये
एकूण विक्री : 157 कोटी 24 लाख 59 हजार 600 रुपये