new-img

नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीने मोडला सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड

नंदुरबार बाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी (दि. 15) तब्बल 33 हजार 800 रुपये क्विंटलने विक्री झाली. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.

नंदुरबारचे लाल मिरचीचे मार्केट प्रसिद्ध आहे. दरवर्षी अडीच ते तीन लाख क्विंटल ओल्या मिरचीची आवक येथील बाजार समितीत होते. यंदादेखील साडेतीन लाख क्चिटलपर्यंत मिरचीची खरेदी झाली आहे. आता ओल्या मिरचीची आवक कमी झाली असून, कोरड्या मिरचीची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी वेळदा येथील शेतकऱ्याच्या कोरड्या लाल मिरचीला तब्बल 33 हजार 800 रुपये क्विंटल भाव मिळाला.