new-img

महत्वाची अपडेट! भारतातून 55 हजार टन कांदा परदेशात जाणार

बांगलादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान या देशांना 31 मार्चपर्यंत 54 हजार 760 टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना परवानगी दिली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिगटाच्या मान्यतेनंतर मित्रदेशांना सुमारे तीन लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार, बांगलादेशला 50 हजार टन, मॉरिशसला 1200 टन, बहरीनला 3000 टन, तर भूतानला 560 टन कांदा ३१ मार्चपर्यंत निर्यात करण्यास कांदा व्यापाऱ्यांना परवानगी दिली आहे. त्याबाबतची रूपरेषा आखली जात असल्याची माहिती ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंग यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सिंग यांनी नमूद केले.