new-img

शेतकरी मालामाल! नव्या हळदीला कमाल 15,377 रुपयांचा दर

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवा मोंढा बाजारात सध्या नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (दि. 22) नवा मोंढा बाजारात जवळा पांचाळ (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील अहेमद शेख या शेतकऱ्याच्या हळदीला कमाल 15 हजार 377 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

गुरुवारी (दि. 22) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात दीड हजार क्विंटल हळदीची आवक झाली. यात कमाल 15 हजार 377, किमान 10 हजार 777 तर सरासरी 13 हजार 777 रुपये दर मिळाला. बाजार समितीत सध्या दररोज दीड हजार ते दोन हजार क्विंटल हळदीची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आलीये.

नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हदळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. ही हळद नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजार समितीत विक्रीसाठी आणली जाते. या दोन बाजार समित्यांना हळदीच्या व्यापारावर चांगलेच उत्पन्न मिळते.