new-img

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शशिकांत गाडे

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला आहे. सभापतीपदी वाजे गटाचे शशिकांत गाडे विराजमान झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे गटाचा पराभव झाला आहे.

सिन्नर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे यांच्या गटाने पुन्हा एकदा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटावर सरशी केली आहे. कोकाटे गटाच्या दोघा संचालकांना गळाला लावत त्यापैकी शशिकांत गाडे यांना सभापती पदावर विराजमान करण्याची खेळी वाजे-सांगळे गटाने खेळली. त्यामुळे तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.