new-img

बांगलादेशाला 50 हजार टन कांद्याची निर्यात होणार, अधिसूचना जारी

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीला सशर्त परवानगी दिली आहे. आता बांगलादेशात 50 हजार टन कांद्याची निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोट्र्समार्फत ही निर्यात केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी शुक्रवारी (दि. 1) अधिसूचना काढली आहे. परकीय व्यापार (विकास आणि नियमन) अधिनियम, 1992 नुसार सुधारित परकीय व्यापार धोरण, 2023 मधील तरतुदीनुसार केंद्र सरकारने एनसीईएलमार्फत बांगलादेशला 50 हजार टन कांद्याची निर्यातीसाठी परवानगी दिली आहे.